Maharastra Weather Update पुढील 4 ते 5 दिवस विदर्भामधील या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट

Maharastra Weather Update महाराष्ट्रामध्ये मॉन्सून दाखल झाला आहे. राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि सोलापूरपर्यंत मान्सून पोहोचला आहे. हवामान मान्सूनच्या प्रवासासाठी अतिशय अनुकूल असल्याचं भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी म्हटलंय.

मॉन्सून राज्यात दाखल झाला म्हटल्यावर शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी?, असा प्रश्न पडतो. तर, हवामान विभाग आणि कृषी विभागाकडून याबाबत मोठा सल्ला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये,असं होसाळीकर यांनी म्हटलं आहे. Maharastra Weather Update

आज 9 जून पासून पुढील चार ते पाच दिवस हे विदर्भातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे

गेल्या काही दिवसांपासून वाढलेले तापमान आणि उकड्यामुळे नागरिक  हैराण झाले असून आता साऱ्यांना पावसाची आतुरता लागली आहे. एकीकडे मान्सूनची चाहूल लागली असताना नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तसेच येत्या 10 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, त्यापूर्वीच राज्यात मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. Maharastra Weather Update

हवामान विभागाने दिलेले अंदाजानुसार विदर्भातही (Vidarbha) दमदार पावसाने एंट्री करत एकच दाणादाण उडवली आहे. तर आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील (Vidarbha) जवळ जवळ सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याचा अंदाजही हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आला आहे.

Maharastra Weather Update
Maharastra Weather Update

विदर्भात पुढील 5 दिवस मान्सून पूर्व पावसाचा इशारा (Maharastra Weather Update)

आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह 30-50 किमी प्रती तास सोसाट्याचा वारा आणि पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर आज पासून पुढील 5 दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. आगामी काळात विदर्भात सर्वत्र तुरळक ते माध्यम स्वरूपात पावसाच्या सरी कोसळण्याचाही अंदाज आहे.

अनेक झाडे अन् विद्युत खांबांची पडझड, घरांवरील छत उडाली (Maharastra Weather Update)

गोंदियात काल शुक्रवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसाचा तडाखा शहारवाणी परिसराला बसला आहे. वादळी पावसामुळे अनेक घरांवरील टीन पत्र्याचे छत उडाले. तसेच झाडांची आणि विद्युत खांबांची पडझड झाली. गोंदिया जिल्ह्यातील शहारवाणी परिसरात मंगळवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जवळपास 15 ते 20 मिनिटे झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात अनेक मोठी झाडे उन्मळून पडली आहेत, तर अनेक विद्युत खांब पडल्याने विज पुरवठा खंडित झाला आहे. या सोबतच शेतकऱ्यांचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याने नागरिकांनी आता शासनाकडे मदतीची मागणी केली आहे.

शेतकरी मशागती नंतर लागवडीच्या प्रतीक्षेत (Maharastra Weather Update)

ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यात मान्सूनपूर्व अवकाळी आणि वादळी पावसाने अनेकदा हजेरी लावली. त्यामुळे जमीन ओलसर असल्याने शेतकऱ्यांना उन्हाळवाईची मशागत करण्यास शेतकऱ्यांना सोपे गेले. मशागतीची कामे आटोपली असून काही भागात तर जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी लागवडीस सुरुवात केली. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवडही केली. शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आठवड्याभरात जोरदार पाऊस झाल्यास शेतकरी लागवडीच्या कामाला लागणार आहे. यावर्षी एकट्या यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात 9 लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. त्यात कापूस सर्वाधिक 4 लाख 57 हजार हेक्टरवर त्यापाठोपाठ सोयाबीन 2 लाख 94 हजार तर तूर 1 लाख 15 हजार हेक्टर लागवडीचे नियोजन आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्याला 2 लाख 54 हजार 450 मेट्रीक टन इतक्या विविध प्रकारच्या खतांची आवश्यकता आहे.

हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील जिल्हे आणि विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा दिला आहे. या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

खालील महत्वाचे टॉपिक सुद्धा वाचा

Soil Testing What Is Soil माती परीक्षण म्हणजे काय आणि माती परीक्षणाचे काय फायदे आहेत?

Monsoon मान्सूनचे वय काय ? जगात कुठे कुठे मान्सून असतो…?

Follow On Instagram

Follow On WhatsApp

Leave a Comment