Best Organic Farming Sendriya sheti सेंद्रिय शेतीचे फायदे. सेंद्रिय शेती म्हणजे काय?

सध्या जागतिक स्तरावर सेंद्रिय शेती उत्पादनांना (ORGANIC FARMING)  मागणी वाढत आहे.  लोकांना विषमुक्त खायला हवे आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढणार आहे.  तसेच ORGANIC FARMING/सेंद्रिय शेतीमुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढत आहे. पर्यावरणाचा समतोल साधला जाऊन जमिनीची सुपीकता वाढत आहे. या मुख्य जमेच्या बाजू आहेत. हे लक्षात घेता सेंद्रिय शेतीचे संशोधन, प्रशिक्षण व विकास या बाबींना प्राधान्य देऊन, सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या हेतूने सेंद्रिय शेती करणे सध्याच्या युगात अत्यंत गरजेचे आहे

https://krushikanya.com/

Join WhatsApp 

  सेंद्रिय शेती म्हणजे काय? (WHAT IS ORGANIC FARMING) (Organic Farming)

तर सेंद्रिय शेती म्हणजे पर्यावरणातील सजीवांची रचना, जीवनक्रम समजून रासायनिक घटकांचा वापर न करता केलेली एकात्मिक शेती पद्धती म्हणजे ‘सेंद्रिय शेती’ होय. शेती करत असताना रासायनिक घटकांचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष, शेणखत, गोमूत्र, कोंबडी खत, लेंडी खत, गांडूळखत, हिरवळीचे खत यासारख्या नैसर्गिकरित्या उपलब्ध  साधनांचा वापर करून पारंपारिक पद्धतीने शेती करणे. यामुळे जमिनीची सुपीकता सुधारते तसेच पर्यावरणाचे प्रदूषण ही कमी होते.

गेल्या काही दशकात शेतीमध्ये रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा बेसुमार वापर होत आहे. त्यामुळे कीटकनाशकांचे अंश भाजीपाला, अन्नधान्य व फळे या मध्ये दिसू लागले आहेत. या कीटकनाशकामुळे परागीभवनासाठी मदत करणाऱ्या मधमाशा, मित्रकीटक यांची संख्या कमी होत आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होऊ लागला आहे. रासायनिक कीटकनाशकामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले, पर्यायाने कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे.

सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्ये: (Organic Farming)

मातीची सुपीकता:

आपण रासायनिक खतांचा व औषधांचा गरजेपेक्षा जास्त वापर आपल्या शेतामध्ये करतो तेव्हा कुठे ना कुठेतरी त्याचा परिणाम हा आपल्या जमिनीवर होत असतो. Organic Farming सेंद्रिय शेती ही पूर्वापार चालत आलेली एक स्थायी आणि पर्यावरणासाठी अनुकूल अशी शेती प्रक्रिया आहे. अन्नसुरक्षा व पर्यावरण तसेच शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर आहे. रासायनिक खतांचा वापर थांबवणे त्याऐवजी सेंद्रिय आणि जैविक खतांचा उपयोग करणे, पिकांचे अवशेष जमिनीमध्ये कुजवणे.

https://krushikanya.com/

पावसाच्या पाण्याचे संवर्धन/साठवण:

पाझर तलाव, शेततळे खोदणे, उतारावर बांध घालणे, बांधावर कमी  उंचीची झाडे/झुडुपे लावणे. यासारख्या बाबींचा अवलंब करून पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे.

स्वावलंबन: Organic Farming सेंद्रिय शेती

आपल्याला शेतीसाठी लागणारे बियाणे, कंपोस्ट खत, वर्मी वॉश, जीवामृत सारखे द्रवरूप खते (आळवणी साठी) आणि निंबोळी अर्क, अमृतपाणी, वनस्पती अर्काचे (फवारणी साठी) स्वतःच उत्पादन करणे.

पशुपालन:

शेतकऱ्यांची पाळीव जनावरे ही सेंद्रिय शेती व्यवस्थापनातील महत्त्वपूर्ण घटक आहेत. कारण त्यांचे शेण आणि मूत्र शेतीसाठी खूपच फायदेशीर आहे.

सेंद्रिय शेतीसाठीचे महत्त्वाचे घटक:(Organic Farming)

१.शेणखत: Organic Farming सेंद्रिय शेती

शेण, मूत्र व गोठयातील पालापाचोळा यापासून तयार होणाऱ्या खताला ‘शेणखत’ म्हणतात. शेणाचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे बायोगॅस मधील ऊर्जा निर्मितीसाठी आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणून वापरले जाते. यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश असतात.

Organic Farming

२.हिरवळीची खते:

ताग धेंच्या/ढेलच्या यासारखी लवकर वाढणाऱ्या पिकांची दाट पेरणी करून ती फुलोऱ्यावर येण्याच्या आधी नांगराच्या साह्याने जमिनीत गाडतात. यामुळे जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते. अशा हिरवळीच्या खतामधून जमिनीला नत्र मिळते. या खतामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढून पिकांना पोषक अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

३.गांडूळ खत:

या खतामध्ये गांडूळाची विष्ठा,नैसर्गिक रित्या कुजलेले घटक असतात. गांडूळ खतात नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, संजीवके व सूक्ष्म अन्नद्रव्य हे शेणखताच्या तुलनेत जास्त असतात.

४.जैविक खते:

असिटोबॅक्टर, ॲझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, रायझोबियम, निळे हिरवे शेवाळ, पालाश विरघळविणारे जीवाणू, स्फुरद विरघळविणारे जीवाणू वापरल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. उत्पादनात १५ ते २०टक्के वाढ होते व उत्पादन खर्च कमी होतो. बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण होते.

५.जैविक कीटकनाशके:

ट्रायकोडर्मा, एच ए एन पी व्ही, व्हर्टिसिलियम लेकॅनी, मेटाऱ्हायझीम अॅनिसोप्लीई, बिव्हेरिया बॅसियाना यांचा वापर केल्याने कीड नियंत्रण करता येते.

६.आंतरपिके:

आंतरपीक किंवा मिश्र पीक पद्धती हा सेंद्रिय शेतीचा गाभा आहे असे म्हणता येईल. आंतरपीक म्हणजेच दोन किंवा दोनपेक्षा अधिक पिके एकाच शेत जमिनीवर, एकाच हंगामात लागवड करणे. या पीक पद्धतीचा अवलंब केल्यामुळे तण नियंत्रण होण्यास मदत होते, रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. जमिनीचा पोत सुधारतो.

७.एकात्मिक कीड व्यवस्थापन:

या पद्धतीचा अवलंब करून विविध किडीवर नियंत्रण करता येते. परभक्षी कीटक उदा. ढालकीडा (लेडी बर्ड बीटल) क्रायसोपा, सिरफीड माशी, भक्षक ढेकूण व परोपजीवी कीटक उदा. ट्रायकोग्रामा अपेनटेलस, ब्रेकोन इत्यादी मित्र कीटकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. कामगंध सापळ्यांचा उपयोग किडीच्या नर पतंगाला आकर्षित करण्यासाठी तसेच पांढरी माशी, मावा, नागआळी यांच्या नियंत्रणासाठी पिवळ्या रंगाचे व फुलकिडीचे नियंत्रण करण्यासाठी निळ्या रंगाचे चिकट सापळे वापरावेत.

सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कार:

सेंद्रिय शेतीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकरी व संस्थेला सन २००९-१० या वर्षापासून कृषिभूषण पुरस्कार देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील जे शेतकरी या संकल्पनेचा अवलंब आपल्या शेतीमध्ये करतील, त्यांना प्रोत्साहन पर रोख रक्कम रु. ५०,०००/- , स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सपत्नीक सत्कार केला जातो.

रासायनिक खतांचा आणी औषधांचा गरजेपेक्षा जास्त वापर केल्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. त्यामुळे सेंद्रिय अन्नाची मागणी देशभरात व संपूर्ण जगात वाढत आहे. आपल्या शेतकऱ्यांना ही एक सुवर्ण संधी आहे. आणि म्हणूनच विषमुक्त व चांगल्या गुणवत्तेची  फळे, भाजीपाला व अन्नधान्य हवे असेल तर आपण ही ORGANIC FARMING सेंद्रिय शेती केली पाहिजे.

 

Leave a Comment