यावर्षीचा उन्हाळा फारच कडक तापलेला आहे. परंतु यावर्षीचा पावसा शेतकऱ्यांसाठी सुखदायक ठरणार आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असे असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे या वर्षी मान्सून पहिल्या जूनच्या हप्त्यामध्ये आगमन होणार आहे. मान्सूनचा मोसमी पाऊस नेमका कसा आणि कुठे तयार होतो. त्याचा मागचा इतिहास काय? आणि तो मान्सून पाऊस कुठे कुठे पडतो हे आपण या लेखात पाहू. Monsoon
बातमी म्हणजे यंदांचा मान्सूनच्या सऱ्या भरपूर आणि मनसोक्त बरसणार आहेत. अशी माझी आपल्या भारतीय हवामान खात्याने दिलेली आहे.आपला देश हा कृषिप्रधान देश असून जीडीपीच्या साठ टक्के उत्पन्न हे कृषिजन्य उत्पादनातून मिळते.यामुळेच आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान आहे.
दरवर्षी बळीराजा शेतकरी हा हा मान्सूनच्या पावसाच्या ढगाचे एखाद्या देवाप्रमाणे वाट बघत असतो. हाच आणि हाच आनंद यावर्षी भरपूर मिळणार आहे कारण सरासरीपेक्षा यावर्षी जास्त पाऊस आपल्या भारतामध्ये कोसळणार आहे असे हवामान खात्याने सांगितलेली आहे.मान्सून आला की आपल्या शेतकऱ्याला एक वेगळाच आनंद होतो सर्वात अगोदर मान्सून हा अंदमानत दाखल होतो तिथून मजल दरमजल करत तो केरळमध्ये दाखल होतो त्यानंतर तो मुंबईत जूनच्या साधारण पहिल्या आठवड्यात आपली पहिली हजेरी लावतो. Monsoon
व्हाट्सअप च्या ग्रुप ला जॉईन व्हा
मान्सूनची चमत्कारी गोष्ट Monsoon
मोसमी पाऊस ही पृथ्वीवर घडणारी चमत्कारिक गोष्ट आहे. आपण शाळेत भुगोलातील पुस्तकात शिकलोय की पृथ्वी स्वत: भोवती फिरता… फिरता सुर्याभोवती देखील फिरत असते. पृथ्वी अक्षापासून थोडीसी कललेली असते. त्यामुळे पृथ्वी थोडीशी तिरकी फिरल्याने पृथ्वीवर ऋृतूचक्र तयार होते. आपल्या पृथ्वीचा उत्तरेकडेचा भाग जेव्हा सुर्याकडे असतो, तेव्हा उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. तर दक्षिण गोलाधार्त थंडी पडलेली असते. त्यामुळे उत्तर गोलार्धात कमी दाबाचा आणि दक्षिण गोलाधार्त जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो.
असा पडत असतो मान्सून पाऊस Monsoon
वारे नेहमी जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात. त्यामुळे वारे दक्षिण गोलार्धाकडून उत्तर गोलार्धाकडे वाहतात. ऑस्ट्रेलिया दक्षिण गोलार्धात आहे, त्यामुळे हिंद महासागरातून वारे वाहत अरबी समुद्रावरुन भारतात येतात. अरबी समुद्रापेक्षा जेव्हा राजस्थान परिसरातील वारे अधिक तापलेले आढळतात. तेव्हा तेथेही कमी दाबाचा पट्टा तयार होत असतो. एवढा सगळा प्रवास करताना हे वारे सोबत गरम बाष्प घेऊन आलेले असतात. हे बाष्प घेऊन आलेले ढग आकाशात उंच ठिकाणी जातात. तेव्हा तेथे थंड हवा लागल्याने ढगातील बाष्प पावसाच्या रुपाने जमीनीवर कोसळते. त्यालाच पाऊस म्हणतात.
‘एल- निनो’ आणि ‘ला -निना’ Monsoon
भारतातील पावसावर समुद्रातून आलेल्या वाऱ्यांचा प्रभाव पडतो. एक म्हणजे एल- निनो स्थिती. या स्थितीत दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीतील पॅसिफीक महासागराचे पाणी तापते आणि तेथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळे आपल्याकडे येणारे काही मोसमी वारे दक्षिण अमेरिकेच्या दिशेने सरकतात, त्यावेळी अशा स्थितीत आपला मान्सून कमजोर पडतो. मग आपल्याकडे दुष्काळ पडू लागतो. ही स्थिती कधी तयार होईल याचे काही वेळापत्रक नाही. याच्या उलट परिस्थिती ‘ला -निना’ स्थितीत होते. या स्थितीत अरब आणि हिंद महासागरातील पाणी थंड होते. आणि तेथे जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. आता वारे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारतातील कमी दाबाच्या पट्ट्यात वाहायला सुरुवात होते. येथून बाष्प घेऊन वाहणारे शक्तीशाली वारे भारतात प्रचंड पाऊस पाडतात. आणि भारतात पूरसृदृश्य स्थिती निर्माण होते.
भारतामध्ये मान्सूनचे वय किती? Monsoon
भारतामध्ये काही अवमान अभ्यासाच्या मान्सूनची ही परिस्थिती लाखो वर्षापासून आहे आम्ही सर्वजणीचे पठार यांच्या माध्यमातून मान्सून जवळ 70 लाख असे म्हटले जाते. मान्सूने जगभरात अनेक ठिकाणी आहे जसे की केनिया दक्षिण अमेरिका सुमालिया इंडोनेशिया कांगो मलेशिया युगांडा ठिकाणी मान्सून आहे.परंतु भारतामध्ये मान्सूनचे आगमन जून महिन्यामध्ये होते.मान्सून दाखल झाल्याचे हे ओळखण्यासाठी स्वतःचे येथेच आहे पाऊस किमान दोन दिवस सतत सुरू राहिला आणि सर्वजूर पर्जन्यमापक यंत्राद्वारे त्याची मोजणी केली जाते. ती 2.5 मीमी झाली पाहिजे तेव्हाच हवामान खाते मान्सून आल्याचे जाहीर करते भारतातील मान्सून हा बाकीच्या देशापेक्षा सर्वात जास्त असतो तो चार महिने एवढा असतो एवढा दीर्घकाळ मानसून जगात कुठे होत नाही
मान्सून म्हणजे काय What is Monsoon
मान्सून या शब्दाची उत्पत्ती अरबी शब्द ‘मौसिन’ या शब्दापासून झालेली आहे. ‘मौसिन’ याचा अर्थ मौसम असा होतो. अरबमध्ये समुद्रात नावा घेऊन उतरलेल्या नावाड्यांनी मॉवसिम ( मान्सून ) हा शब्द शोधून काढला आहे. यानंतर मानसूनी वाऱ्यांना मान्सून म्हणायला सुरुवात झाली. मान्सून वारे उन्हाळ्यातील मे ते ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंतच्या कालावधी नैऋत्ये दिशेकडून वाहतात. आणि इतर वेळी ईशान्येकडून वाहतात. याला ‘मौसमी वारे’ असेही म्हणतात. परंतु, आशियाई किनारी प्रदेशांमध्ये ‘मान्सून’ या शब्दाचा अर्थ ‘पावसाळा’ या अर्थी वापरला जातो. बंगालच्या उपसागरातून आणि नैऋत्येकडील अरबी समुद्रातून वाहणाऱ्या मोठ्या मोसमी वाऱ्यांचा संदर्भ देण्यासाठी ब्रिटीश भारत आणि शेजारील देशांमध्ये हा शब्द पाऊस या अर्थीच वापरत. जगातील प्रमुख मान्सून प्रणालींमध्ये पश्चिम आफ्रिकन, आशिया-ऑस्ट्रेलियन, उत्तर अमेरिकन आणि दक्षिण अमेरिकन मान्सून यांचा समावेश होतो.