मागेल त्याला सोलार पंप योजना

नमस्कार शेतकरी मित्रांनो मागेल त्याला कृषी सोलर पंप MTSKPY योजनेचे अर्ज आता चालू झालेले आहेत तरी सर्व शेतकरी बांधव आता सोलर पंपासाठी अर्ज करू शकतात.हा ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे भरायचा आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहे आणि कोणती कागदपत्रे आपल्याला लागतात ते आपण लेखामध्ये पाहणार आहोत आणि तो कसा भरायचा हे सुद्धा आपण पाहणार आहोत.

MTSKPY

ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरीता पारंपारिक पध्दतीने विजपुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषीपंप आस्थापित करण्यात येणार आहेत.

मागेल त्याला सोलार पंप योजना MTSKPY

सौर ऊर्जेचे महत्व लक्षात घेऊन राज्य शासनाद्वारे महाराष्ट्रात सन २०१५ पासून सौर कृषीपंपाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. यापूर्वी अटल सौर कृषीपंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना राबविण्यात आली होती. तसेच सद्यपरिस्थितीत प्रधानमंत्री कुसुम घटक – ब योजने अंतर्गत सौर कृषी पंप आस्थापित करण्यात येत आहे. राज्यात दि. ०६.०९.२०२४ रोजी पर्यंत 2,63,156 सौर कृषीपंप बसविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना या सौर ऊर्जेचा मिळालेला लाभ तसेच सौर कृषीपंपा बाबत शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना  जाहीर केली आहे.MTSKPY

सरकारी काढलेल्या या योजनेअंतर्गत सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून सौर कृषी पंपाच्या 10 टक्के रक्कम व अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्याकडून पंपाची 5 टक्के एवढी रक्कम भरावी लागेल.

अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना  MTSKPY

ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व ज्या ठिकाणी यापूर्वी पारंपारिक कृषीपंपाकरीता वीजपुरवठा देण्यात आला नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणकडे पैसे भरुन प्रलंबित असलेल्या शेतक-यांना प्राधान्य देण्यात येईल.

सौर कृषीपंप पूर्ण कार्यक्षमतेने चालविण्यासाठी जिथे सूर्याची किरणे सोलर पॅनलवर पूर्णपणे पडतील, कुठल्याही प्रकारची सावली अथवा आडोसा त्यावर येणार नाही तसेच पॅनलवर धूळ, घाण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. सोलर पॅनल सूर्यकिरणांच्या दिशेने फिरण्यास वाव असेल अशा ठिकाणी बसविण्यात यावा तसेच जमिनीचा भूभाग हा समपातळीवर असावा. सोलर पॅनल शक्यतो पाण्याच्या स्रोताजवळ व अशा ठिकाणी लावावा जेणेकरून तो सहज स्वच्छ करता येईल.  सोलर पंप हा सोलर पॅनेलच्या जवळच असला पाहिजे. परंतु ज्या क्षेत्रामध्ये सिंचन करावयाचे आहे त्याच क्षेत्रात असला पाहिजे.MTSKPY

एकदा स्थापित केलेला सौर कृषीपंप पुन्हा स्थापन करणे किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवणे योग्य नाही. शासन शुद्धीपत्रक दि. ०५.०३.२०२४ अन्वये, सौर कृषीपंप आस्थापित केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सदर सौर कृषीपंपाची विक्री अथवा हस्तांतरण करण्यास बंदी राहील. लाभार्थी शेतकऱ्यांनी अशा सौर कृषीपंपांची विक्री अथवा हस्तांतरण केल्यास त्यांचेविरुध्द महावितरण कंपनी यांचेद्वारे गुन्हा दाखल करण्यात येईल.

MTSKPY

योजनेची ठळक वैशिष्टे:

  • शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना
  • सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ १० टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच
  • अनुसूचित जाती – जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के
  • उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान
  • जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपीचे पंप
  • पाच वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्स सह
  • वीजबिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही
  • सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा
लाभार्थी निवडीचे निकष:
  • २.५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषीपंप, २.५१ ते ५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा आणि ५ एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाचे मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील.
  • वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील.
  • ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत.
  • अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील. MTSKPY
आवश्यक कागदपत्रे:
  • शेतक-यांकडे असलेल्या शेतीचा 7/12 उतारा (जाल्स्त्रोताची नोंद आवश्यक आहे),
  • आधारकार्ड,
  • जातीचे प्रमाणपत्र (अनुसुचित जाती/ जमाती लाभार्थींसाठी) या कागदपत्रांची सत्यप्रत आवश्यक आहे.
  • अर्जदार स्वत: शेतजमिनीचा एकटा मालक नसेल, तर इतर हिस्सेदारांचा / मालकांचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे.
  • पाण्याचा स्त्रोत डार्क झोन मध्ये असल्यास भुजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.
  • या व्यतिरिक्त संपर्काकरीता ग्राहकांचा मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता (असल्यास),
  • पाण्याचे स्त्रोत व त्याची खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे.MTSKPY
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा

या योजने अंतर्गत नवीन सौर कृषीपंप मिळण्याकरीता महावितरणतर्फे स्वतंत्र वेब पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. खालील वेबपोर्टल लिंक वर जाऊन, अर्जदारास A-1 अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. सदर अर्ज अगदी साधा व सोपा असून, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करवयाचे आहे.MTSKPY

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

पोर्टल ओपन केल्यानंतर “लाभार्थी सुविधा” च्या मुख्य मेनू मध्ये “अर्ज करा” वर क्लिक करा आणि आवश्यक तपशील भरा.

लाभार्थी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर करताच अर्जदारास त्याचे मोबाईल क्रमांकावर लाभार्थी क्रमांक व इतर तपशील एसएमएस द्वारे कळविण्यात येईल तसेच विविध टप्प्यावर अर्जाची सद्य:स्थितीची माहिती अर्जदारास त्याचे मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. याव्यतिरिक्त, अर्जदारास वेबपोर्टलवर जावून लाभार्थी क्रमांकच्या आधारे अर्जाची सध्यस्थिती बघता येईल.

एखाद्दा अर्जदार शेतक-यास ऑनलाईनद्वारे अर्ज करण्यासाठी अडचणी आल्यास महावितरणच्या तालुका स्तरावरील उपविभागीय कायार्लयाशी संपर्क साधावा. याशिवाय महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. यासाठी महावितरणचे टोल फ्री क्रमांक १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. MTSKPY

हे सुद्धा वाचा

कधी येणार पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता

soybean मध्य प्रदेशात सोयाबीनला 5700 रुपये भाव! काय आहे सत्यता ?

1 thought on “मागेल त्याला सोलार पंप योजना”

Leave a Comment