Organic Farming : युवकाने घेतलाय सेंद्रिय शेतीचा ध्यास तयार केली थेट ग्राहक बाजारपेठा
बुलडाणा जिल्ह्यातील पळशीझाशी येथील प्रताप मारोडे या कृषी पदवीधर तरुणाने वडिलाच्या मार्गदर्शनाखाली रासायनिक अवशेषमुक्त अन्न उत्पादनाची कास धरली आहे. सुमारे ४० एकरात कापूस, कडधान्ये, हळद, केळी, गहू आदी विविध पिकांचे शंभर टक्के सेंद्रिय उत्पादन घेण्याबरोबर अन्य शेतकऱ्यांना सोबत घेऊन सामूहिक स्तरावरील थेट ग्राहक बाजारपेठ तयार करण्यातही हा तरुण यशस्वी झाला आहे.Organic Farming
आपल्या कुटुंबाला रासायनिक अवशेपमुक्त अन्न दररोज मिळावे व त्याचबरोबर समाजालाही त्याचा लाभ घेता यावा या हेतूने त्याने २०१५ च्या दरम्यान दीड एकरात सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने तीन, १५ एकर असे क्षेत्र वाढवत २०२१ पासून ४० एकरात शंभर टक्के सेंद्रिय शेती आकारास आणली आहे. थोड्या क्षेत्रात पिकणारे सेंद्रिय अन्न कुटुंबासाठी उपयोगात येऊ शकते. पण अधिक क्षेत्रात उत्पादित होणाऱ्या सेंद्रिय उत्पादनाला बाजारपेठ व अधिकचे दर मिळण्याची मजबूत व्यवस्था उपलब्ध नाही हे प्रताप यांच्या लक्षात आले. त्यामुळे ‘शेतकरी ते ग्राहक अशी विक्री व्यवस्था उभी करण्याबरोबरच प्रक्रियेची जोड देण्यासाठीही प्रयत्न सुरू केले. यात अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. नुकसानही सोसावे लागले. संघर्ष कायम आहे. मात्र हळूहळू सर्व काही स्थिर होत चालल्याची बाब सुखावणारी आहे.
अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा
…अशी आहे सेंद्रिय शेती Organic Farming
-केळी, देशी व नॉन बीटी कापूस, तूर, उडीद, मूग, हळद, सफेद मुसळी, गहू, दगडी ज्वारी व अन्य हंगामी पिके. सर्व वाण देशी. काही क्षेत्रात बालानगर जातीचे, सीताफळ.
– घरची गायी, म्हशी मिळून २५ जनावरे, त्याच्या शेणापासून वर्षाला तयार होते २५० क्विंटलपर्यंत गांडूळ खत.
गरजेनुसार परिसरातील गीर गोपालकांकडून शेण आणले जाते.
-बोरु- धैच्या यासारखी हिरवळीची खते, पीक अवशेषांचा वापर, पीक फेरपालट आदीचा वापर.
-उत्पादन- केळी- प्रति रास १७ ते २५ किलोपर्यंत. कापूस- तीन क्विंटल, तूर- आठ क्विंटलपर्यंत,
हळद-ओली- ८० क्विंटल.
-शंभरहून अधिक वर्षे वयाच्या चिंचेच्या झाडांचे बाधावर संवर्धन,
तयार केली ग्राहक बाजारपेठ
तूर, मूग, उडीद, हरभरा आदीवर प्रक्रिया करून डाळी तयार केल्या जातात. गावरान बियाणे, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली आणि विनापॉलिश डाळी असल्याने ग्राहकांकडून चागली मागणी असते. संध्या तूरडाळ किलोला २५० रुपये दराने विकली जात आहे. हळद पावडरीची किलोला २५० रुपये दराने विक्री होते. मागील वर्षी गावातच सर्व हळदीची विक्री झाली. मागील वर्षी केळी २१० टन सेंद्रिय केळीचे उत्पादन घेतले. काही माल नवरात्रीत विकला. तर विक्रीची अडचण निर्माण झाल्याने उर्वरित माल बाजारात नेहमीच्या केळीप्रमाणे विकावा लागला. Organic Farming
जमिनीचे कायदेशीर अधिकार देणारी स्वामित्व योजना आहे तरी काय? याचा फायदा कोणाला होणार?
गावरान दगडी ज्वारीला किलोला १५० रुपये, तर गव्हाला ६० रुपये दर मिळतो. स्वताच्या गाव परिसरातील ग्राहक प्रताप यांनी तयार केले आहेतच. शिवाय पुणे, मुंबई, नागपूर आदी शहरे व गावामध्ये भरणाऱ्या बाजारांमध्ये ते सहभागी होतात. यामध्ये विदर्भात होणारे विविध बीजोत्सव, सेंद्रिय शेती महोत्सव, कृषी विद्यापीठे, कृपी विभाग आदीची प्रदर्शने आदींचा समावेश आहे. सन २०२३ मध्ये दिल्लीत भरणाऱ्या बायोफेंक या प्रसिद्ध सेंद्रिय शेतीमाल प्रदर्शनातही स्टॉल उभारला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेंद्रिय शेतीचे व्यासपीठ असलेल्या आयफोएएम या संस्थेचा या प्रदर्शनात पुढाकार असतो. ग्राहक शेतावर येऊनही खरेदी करतात. गहू व तूरडाळीला अधिक मागणी असल्याने अॅडव्हान्स बुकिंगही घेतले जाते. सोशल मीडियातील विविध प्रकार व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारेही उत्पादने नवीन ग्राहकापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न आहेत.Organic Farming
फार्मर आयडी कार्ड बनवा आणि फ्री मिळवा या सुविधा Farmer ID Card
आकर्षक व पर्यावरणपूरक पॅकेजिंगचा वापर केला जातो. उत्पादनाच्या पॅकिंगवर उत्पादनाविपयी पारदर्शक माहिती दिली जाते. ‘शुद्ध आणि नैसर्गिक’ या मूल्याशी शेती व उत्पादने जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
सेंद्रिय वस्वाची निर्मिती
प्रताप आपल्या देशी कापसावर परिसरात जिनिंग करून घेऊन वहाँ येथील ग्राम सेवा मंडळामार्फत चरख्यावर त्याचा धागा काढून घेतात. पुढे आंध्रप्रदेशातील त्यांचे मित्र पी. एन. सतीश याच्या सहकार्यातून त्याचे सेंद्रिय कापड तयार करून घेतात. सध्या कुटुंबातील सर्व सदस्यासाठी पोशाख व साड्या तयार केल्या आहेत. साड्यावर कलाकुसरही केली आहे.Organic Farming