Weather Update महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Weather Update महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्यांनी दिलेली आहे.

 

Weather Update

Weather Update

आपल्या महाराष्ट्रामध्ये सलग 3 ते 4 दिवसापासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे. हवामान शास्त्राच्या नुसार आजही अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपीट चा इशारा देण्यात आलेला आहे तर काही ठिकाणी रेड अलर्टी (RED ALERT) जारी करण्यात आलेला आहे. संपूर्णतः मराठवाडा विदर्भातील उर्वरित जिल्हे अहमदनगर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. Weather Update.

हवामान शास्त्राच्या माहिती नुसार विदर्भामध्ये काही ठिकाणी गारपीटीचा तडाका बसलेला आहे, तसेच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 10 ते 13 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडासह अवकाळी पाऊस आणि वारा व गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे.

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र कुलाबा मुंबई यांनी दिलेल्या सुचलेनुसार जिल्ह्यात  10 ते 13 एप्रिल या कालावधीत येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आलेला आहे.Weather Update

काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची व ताशी 40-50 कि.मी.प्र.ता. वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. 10 ते 13 एप्रिल रोजी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

जॉइन

Maharashtra Weather News : (Weather Update)

राज्यातील कोकण (Konkan), मुंबई (Mumbai) आणि पालघर भाग वगळता उर्वरित भागांमध्ये पावसाळी वातावरण तयार होताना दिसत आहे. सध्या गुजरातपासून कोकणासह कर्नाटकापर्यंत (Karnataka) वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण होत असल्यामुळं या भागांमध्ये तापमानाचही चढ- उतार नोंदवण्यात येत आहेत. तर, काही भागांवर ढगांचं सावट पाहायला मिळत आहे. असं असलं तरीही पावसाची हजेरी मात्र राज्याच्या मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र पट्ट्यातच थैमान घालताना दिसणार आहे.Weather Update

मुंबई वगळता राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये ढगाळ हवामानाचे सावट असून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. अनेक ठिकाणी रेड, ऑरेंज आणि यलो (Red, Orange, Yellow) अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

https://krushikanya.com/

Goat Farming Loan In India शेळीपालनासाठी तुम्हाला ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते, येथे अर्ज करा

पीएम कुसुम योजना 2024 PM KUSUM YOJNA 2024 BEST

 

Leave a Comment