Today Weather Update
पुढील 24 तासात राज्यासह देशात मध्ये मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Rain Alert. गरमी पासून मिळणार सर्वाना दिलासा या भाग मध्ये पावसाची शक्यता)
महाराष्ट्रात कसं असेल हवामान?
पुढील चार ते पाच दिवस राज्यातील कमाल तापमानात 2 ते 3 अंशानी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतही आर्द्रतेचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे तापमानाचा पार चाळीशीपार जाऊ शकतो. कोकण आणि मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.(Rain Alert. गरमी पासून मिळणार सर्वाना दिलासा या भाग मध्ये पावसाची शक्यता)
Panjabrao Dakh News : मार्च महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने झाली. विशेष म्हणजे 16 मार्च ते 20 मार्च दरम्यान महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसला. या कालावधीमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील झाली.परिणामी शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. 20 तारखे नंतर मात्र राज्यात तापमान वाढ पाहायला मिळाली. राज्यातील अनेक भागात तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा विक्रमी टप्पा ओलांडला. विदर्भातील काही शहरांमध्ये तर तापमान 42°c पर्यंत पोहोचले.उत्तर महाराष्ट्रात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. अशातच मात्र कालपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामानात बदल पाहायला मिळत आहे. आता राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सत्र सुरू झाले आहे.
हवामान खात्याने आज देखील राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात देखील पावसाचा अंदाज आहे.उद्या विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील राज्यात 31 मार्च पर्यंत पावसाचा अंदाज दिला आहे.31 मार्चपर्यंत राज्यातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस बरसणार असे डख यांनी यावेळी म्हटले आहे. परंतु यावेळी खूप मोठा पाऊस पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी फार काळजी करण्याची गरज नाही असेही त्यांनी सांगितले आहे
(Rain Alert. गरमी पासून मिळणार सर्वाना दिलासा या भाग मध्ये पावसाची शक्यता)
पुढील 48 तास मुसळधार पाऊस
वायव्य भारत आणि पश्चिम हिमालयीन प्रदेशात पावसाची हजेरी पाहायला मिळण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. आज मैदानी भागात हलक्यात ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील. तर ईशान्य भारतात पुढील 48 तास मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्रात या भागात पावसाची शक्यता.
राज्यात काही ठिकाणी आज पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील 24 तासात राज्यात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इतर ठिकाणी तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. भंडारा, हिंगोली, नाशिक, नागपूरमध्ये शनिवारी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. तर दुसरीकडे पुणे, ठाणे आणि मुंबईत उन्हाच्या झळा बसत आहेत. पुढील दोन ते तीन दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
Panjabrao Dakh यांच्या मनण्या प्रमाणे एप्रिल महिन्यातही पाऊस.
दुसरीकडे पंजाब रावांनी पुढल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यातही अवकाळी पाऊस बरसणार असे म्हटले आहे.
मार्च महिन्याची सुरुवात अवकाळी पावसानेच झाली होती आणि आता एप्रिल महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसानेच होणार असे पंजाब रावांनी यावेळी आपल्या हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे. पंजाबरावांनी 1 एप्रिल ते पाच एप्रिल या कालावधीत राज्यातील हवामान कोरडे राहणार असे म्हटले आहे.पण, 6 एप्रिल, 7 एप्रिल आणि 8 एप्रिलला महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी आपल्या नवीन अंदाजात स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे. (POWER)
हळद, ज्वारीसह अन्य भाजीपाला पिकांच्या नुकसानीची शक्यता
हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरासह ग्रामीण भागामध्ये सायंकाळच्या सुमारास जोरदार स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या वसमतकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी या पावसाने शेतातील हळद ज्वारी यासह भाजीपाला वर्णीय पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. शनिवारी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास झालेल्या या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा पसरला होता.