Farmer UID Card केंद्र सरकार देणार शेतकऱ्यांना नवीन युनिक आयडी

Farmer UID Card केंद्र सरकार देणार शेतकऱ्यांना नवीन युनिक आयडी

Farmer UID Card

Farmer UID Card  

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि त्यांच्या शेतीसाठी फायदा होण्यासाठी आपल्या केंद्र सरकारने आपल्या बळीराजासाठी फार्मर यूआयडी कार्ड (Farmers UID Card) काढलेले आहे.  आपल्या देशातील 11 कोटी शेतकऱ्यांचे आधार कार्ड सारखे फार्मर यु आयडी कार्ड केंद्र सरकार तयार करणार आहे. सन 2024-25 मध्ये 6 कोटी शेतकरी सन 2025-26 मध्ये 3 कोटी शेतकरी आणि 2026-27 मध्ये 2 कोटी असे एकूण 11 कोटी शेतकऱ्यांचे डिजिटल शेतकरी ओळखपत्र केंद्र शासन तयार करण्याचे उद्दिष्ट केंद्र शासनाने सांगितलेला आहे.

यामध्ये आपल्या देशातील सहा राज्यांमध्ये डिजिटल ओळखपत्र आणि डिजिटल सर्वेक्षणाचे प्रयोग सुद्धा करण्यात आलेले आहे. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील बीड जिल्हा सुद्धा हा प्रयोग करण्यात आलेला होता. केंद्र सरकार लवकरच या डिजिटल ओळखपत्रावर लवकरच अंमलबजावणी करणार आहे. अशी सूचना आपल्याला मिळालेली आहे.

आणि सर्वात मेन म्हणजे येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून या सर्व विषयावर म्हणजे आपल्या डिजिटल कार्ड काम करण्यात सुरुवात केंद्र सरकारकडून सुरू होणार आहे.

फार्मर आयडी कार्ड काय आहे ?

Farmer UID Card जसं की आपल्या सर्व भारतीय नागरिकाचे आधार कार्ड आहे. तसेच शासनाने म्हणजे आपल्या केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक फार्म यूआयडी कार्ड काढलेले आहे यामध्ये आपल्या सर्व शेतीची माहिती आपल्याला पाहता येणार.

अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

शाश्वत शेती म्हणजे काय? शाश्वत शेतीची तत्वे आणि फायदे | Sustainable farming 

PM Kisan Yojana 18वीं किस्त: ई-केवाईसी और भूमि वेरिफिकेशन की शर्तें, जानें कैसे उठाएं लाभ

निष्कर्ष: F&Q

फार्मर आयडी म्हणजे काय?
भारत सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय देशातील शेतकऱ्यांचे युनिक आयडी तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. शेतकऱ्याचा युनिक आयडेंटिफायर शेतकऱ्याने घेतलेल्या सर्व कृषी योजनांशी शेतकरी प्रोफाइल लिंक करेल.
Farmer UID Card
शेतकरी आयडी म्हणजे काय?
त्याअंतर्गत, शेतकऱ्यांना एक युनिक आयडी दिला जाईल ज्याचा उपयोग अनेक महत्त्वाच्या सुविधा आणि फायदे मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्यामध्ये कृषी कर्ज, विमा, कृषी कर्ज सुविधा आणि महत्त्वाकांक्षी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत निधीचा लाभ घेता येईल.
शेतकरी कार्ड म्हणजे काय?
किसान क्रेडिट कार्ड योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी आणि संबंधित क्रियाकलापांसाठी तसेच बिगरशेती क्रियाकलापांसाठी बँकिंग प्रणालीकडून गरजेवर आधारित आणि वेळेवर क्रेडिट सहाय्य प्रदान करणे आहे.
Farmer UID Card