E-Peek Pahani 3 ई-पीक पाहणी नोंदणीसाठी तारीख वाढली ही. आहे शेवटची तारीख
ई-पीक पाहणी DCS प्रकल्प E-Peek Pahani 3
पीक नोंदणीसाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत पिकांची नोंद दिलेल्या ७ दिवसाच्या वाढीव अंतिम मुदतीत पूर्ण करून पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, MSP अंतर्गत पिकांची नोंद इत्यादी महत्वपूर्ण योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा करा.
९३ लाख हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांची पीक नोंद
अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा
महसूल विभागामार्फत राज्य ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) या प्रकल्पाद्वारे शेतक-यांना आपला पीक पेरा स्वतः नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या नोंदणीची शेवटची तारीख रविवार दि.१५ होती. मात्र परंतु भरपूर शेतकऱ्यांनी आतापर्यंत पिक पेरा पाहणी केलेली नाही. त्यामुळे सरकारने या पिक पेरा पाहणीची अंतिम तारीख वाढवलेली आहे., अद्यापही काही शेतकर्यांनी ई पीक पाहणी अॅप द्वारे पीक पेरा नोंदविला नसल्याने शेतकर्यांना नोंदणीसाठी दि.२३ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम (Dr. Praveen Gedam) यांनी दिली.
ई-पीक पाहणी करण्यामध्ये काही समस्या असल्यास ०२०२५७१२७१२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करुन मदत घेता येऊ शकते. इंटरनेटची (Internet) आवश्यकता फक्त शेतकरी नोंदणी वा पिक पाहणी अपलोड करणेकामी आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शेतामध्ये इंटरनेट सुविधा नाही, त्याठिकाणी सुद्धा पीक पाहणी करता येते. सहाय्यक, तलाठी स्तरावरील पिक पाहणी नोंदविण्यासाठी देखील सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, आता दि.२४ सप्टेंबर ते दि.२३ नोव्हेंबर या कालावधीत सहाय्यक, तलाठी पीक पाहणी नोंदवू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. E-Peek Pahani 3
2 thoughts on “ई-पीक पाहणी नोंदणीसाठी तारीख वाढली ही. आहे शेवटची तारीख”