Central Government Scheme शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या 7 नव्या योजना

Central Government Scheme शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या 7 नव्या योजना

जय शिवराय मित्रांनो आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये शेतकऱ्यांचे जीवनमान आणि त्यांची उपजीविका सुधारण्यासाठी 13966 कोटी रुपये तरतूद करून 7 नव्या योजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि याच्या संदर्भातील सविस्तर माहिती आजचा आपल्या लेखांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.

Central Government Scheme
Central Government Scheme

अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

Central Government Scheme शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या 7 नव्या योजना

मित्रांनो आज 2 सप्टेंबर 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे अशी बैठक पार पडलेली आहे. त्या बैठकीमध्ये 13 हजार 966 कोटी रुपये या खर्चाच्या या सात योजना मंजुरी देण्यात आलेली आहे.
त्यामध्ये पहिली योजना असणार आहे की. Digital Agriculture Mission डिजिटल कृषी अभियान त्याच्यासाठी 2817 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या रचनेवर आधारित, डिजिटल कृषी अभियान हे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करेल. या अभियानाचा एकूण खर्च 2.817 कोटी रुपये आहे. यात दोन आधारभूत स्तंभ आहेत.Central Government Scheme

  1. ऍग्री स्टॅक
    1. शेतकरी नोंदणी कार्यालय
    2. गाव भू-अभिलेख नोंदणी कार्यालय
    3. पीक पेरणी नोंदणी कार्यालय
  2. कृषी निर्णय समर्थन प्रणाली
    1. भौगोलिक डेटा
    2. दुष्काळ/पूर निरीक्षण
    3. हवामान/उपग्रह डेटा
    4. भूजल/जल उपलब्धता डेटा
    5. पीक उत्पादन आणि विम्यासाठी प्रतिमानीकरण

अभियानात खालील गोष्टींची तरतूद आहे:Central Government Scheme

  • माती प्रोफाइल
  • डिजिटल पीक अंदाज
  • डिजिटल उत्पन्न प्रतिमानीकरण
  • पीक कर्जासाठी संपर्क व्यवस्था
  • एआय आणि बिग डेटा सारखे आधुनिक तंत्रज्ञान
  • खरेदीदारांशी संपर्क व्यवस्था
  • मोबाईल फोनवरून अद्ययावत माहिती

 अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी पीक विज्ञान: एकूण 3,979 कोटी रुपये खर्च. हा उपक्रम शेतकऱ्यांना हवामानातील बदलाला अनुकूल बनवेल आणि 2047 पर्यंत अन्न सुरक्षा प्रदान करेल. त्याचे सहा स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत.Central Government Scheme

  1. संशोधन आणि शिक्षण
  2. वनस्पती अनुवांशिक संसाधन व्यवस्थापन
  3. अन्न आणि चारा पिकासाठी अनुवांशिक सुधारणा
  4. कडधान्य आणि तेलबिया पीकातील सुधारणा
  5. व्यावसायिक पीकातील सुधारणा
  6. कीटक, सूक्ष्मजंतू, परागकण इत्यादींवर संशोधन.

3. कृषी शिक्षण, व्यवस्थापन आणि सामाजिक शास्त्रांचे बळकटीकरण: एकूण 2,291 कोटी रुपये खर्चासह हा उपक्रम कृषी विद्यार्थी आणि संशोधकांना सध्याच्या आव्हानांसाठी तयार करेल आणि त्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे.Central Government Scheme

  1. भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत
  2. कृषी संशोधन आणि शिक्षणाचे आधुनिकीकरण
  3. नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने
  4. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर … डिजिटल डीपीआय, एआय, बिग डेटा, रिमोट इ
  5. नैसर्गिक शेती आणि हवामान अनुकूलतेचा समावेश

4. शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादन: एकूण 1,702 कोटी रुपये खर्चासह, पशुधन आणि दुग्धव्यवसायातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे या निर्णयाचे उद्दिष्ट आहे. त्यात खालील गोष्टींचा समावेश आहे.Central Government Scheme

  1. पशु आरोग्य व्यवस्थापन आणि पशुवैद्यकीय शिक्षण
  2. दुग्ध उत्पादन आणि तंत्रज्ञान विकास
  3. पशु अनुवांशिक संसाधन व्यवस्थापन, उत्पादन आणि सुधारणा
  4. प्राण्यांचे पोषण आणि लहान रवंथ निर्मिती आणि विकास

5. फलोत्पादनाचा शाश्वत विकास: 860 कोटी रुपयांच्या एकूण खर्चासह या उपाययोजनेचे उद्दिष्ट बागायती पिकांमधुन  शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. त्यात खालील गोष्टींचा समावेश आहे

  1. उष्णकटिबंधीय, उप-उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण बागायती पिके
  2. मूळ, कंद, कंदाकृती आणि शुष्क पिके
  3. भाजीपाला, फुलशेती आणि मशरूम पिके
  4. वृक्षारोपण, मसाले, औषधी आणि सुगंधी वनस्पती

6. 1,202 कोटी रुपयांच्या खर्चासह कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरण

7. 1,115 कोटी रुपयांच्या खर्चासह नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन

हे सुद्धा वाचा

पिक विमा साठी ऑनलाईन क्लेम कसा करावा. Crop insurance2024

जमिनीचे सर्व जुने कागदपत्रे आता आपल्या मोबाईलवर पाहता येणार ते सुद्धा मोफत Old Land Record

2 thoughts on “Central Government Scheme शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या 7 नव्या योजना”

Leave a Comment