Maharashtra Weather Update News पावसाचा जोर आजपासूनच कमी होणार आहे

Maharashtra Weather Update News

पंजाबरावांचा एक नवीन अंदाज समोर आला आहे. पंजाब रावांनी म्हटल्याप्रमाणे चार तारखेपर्यंत म्हणजेच आजपर्यंत महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पण, पावसाचा जोर आजपासूनच कमी होणार आहे. आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर असाच कमी राहण्याची शक्यता आहे. सात सप्टेंबर पर्यंत म्हणजेच आजपासून पुढील तीन-चार दिवस महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी राहणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.Maharashtra Weather Update News

Weather Update

Maharashtra Rain : Maharashtra Weather Update News 

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने दडी मारली. जवळपास सात-आठ दिवस पाऊस गायबच होता. यामुळे सप्टेंबर मध्ये पाऊस कसा राहणार हा मोठा यक्षप्रश्न उभा ठाकला होता. पण, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पंजाब रावांनी सप्टेंबर मध्ये पाऊस मैदान गाजवणार असे म्हटले होते.

झालं देखील तसंच सप्टेंबर ची सुरुवात झाली आणि पावसाने गिअर ओढला. अहो, जिथं जुलैमध्येही चांगला पाऊस झाला नव्हता, ऑगस्टमध्ये ही समाधानकारक पाऊस नव्हता त्या भागातही सप्टेंबरच्या दोनच दिवसात पावसाने दाणाफान उडवली. काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. पंजाब रावांनी म्हटल्याप्रमाणे मराठवाड्याकडून पावसाला सुरुवात झाली. पंजाबरावांनी 31 ऑगस्ट च्या आपल्या अंदाजात मराठवाड्यातील नांदेड, परभणी कडून पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार असे म्हटले होते.Maharashtra Weather Update News

पिक विमा साठी ऑनलाईन क्लेम कसा करावा. Crop insurance2024

यानुसार पावसाने मराठवाड्याकडून सुरुवात केली आणि पाहता-पाहता संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात धुमाकूळ घातला. हा मुलुख अगदीच पायदळी तुडवला. यामुळे मात्र राज्यातील बहुतांशी भागांमध्ये सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले. सोबतच शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसानही झाले.

महत्त्वाचे म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरण येत्या काही दिवसात शंभर टक्के क्षमतेने भरणार असा विश्वास पंजाबरावांनी आपल्या मागील अंदाजात व्यक्त केला आहे.

भारतीय हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी एक आकडेवारी जाहीर केली होती या आकडेवारी मध्ये एक जून ते 30 ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्रात जेवढा पाऊस पडतो त्याहून जवळपास 26 टक्के अधिक पाऊस एक जून ते 31 ऑगस्ट या कालावधीतच पडला आहे.Maharashtra Weather Update News

अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

या कालावधीत राज्यात सरासरीच्या तुलनेत 126% पाऊस झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून यंदा पाऊसमान सरासरीपेक्षा फार अधिक राहणार असल्याचे दिसतय.

विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर या भागांमध्ये काही अंशी कमी झाला असून, येत्या काळात हाच पाऊस कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर बरसताना दिसणार आहे. ज्यामुळं आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये अडचणी आणखी वाढताना दिसणार असल्याचा अंदज वर्तवण्यात येत आहे.Maharashtra Weather Update News

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच पावसानं कोकणाकडे मोर्चा वळवल्यामुळं पाऊस गणपती गाजवणार असं म्हणणं वावगं ठरणार नाही. देशात सध्या राजस्थानपासून कमी दाबाच्या पट्ट्याचं एक क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये पूर्वेला सक्रिय आहे. तर, गुजरातच्या दक्षिणेपासून केरळच्या मध्य किनारपट्टी क्षेत्रापर्यंत सक्रिय असल्याचं स्पष्ट झाल्यामुळं कोकणासह राज्यातील घाटमाथ्यावर पाऊस जोरदार हजेरी लावताना दिसणार आहे. तर, विदर्भातील काही भागांची पावसाच्या तडाख्यातून सुटका नाही हेसुद्धा हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.Maharashtra Weather Update News

 

Leave a Comment