शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पंजाब डख हवामान अंदाज
उत्तर महाराष्ट्र हवामान अंदाज Panjab Dakh
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो कि, तुमच्या भागात आज आहे 28 अजून तीन दिवस म्हणजे 30 मे 2025 पर्यंत पाऊस पडणार आहे, त्यानंतर 31 मे पासून 5 जूनपर्यंत हवामान कोरडे राहणार आहे, सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा.Panjab Dakh
माझी तुम्हाला विनंती, तुम्ही 31 मे ते 5 जूनपर्यंत तुम्ही शेतीची कामे आटपून घ्या, कापसाच्या लागवडी करायच्या असेल तर, करू घ्या, त्याच्यानंतर तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे 6 जूनला परत पाऊस येणार आहे, 6 ला येईल 7 ला पुन्हा वाढत जाईल, तसाच वाढत वाढत म्हणजे 30 तारखेपर्यंत, म्हणजे तुमच्या उत्तर महाराष्ट्राची चान्गली पेरणी होणार आहे.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अंदाज – पंजाब डख
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो,अजून आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ,दक्षिण महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र,खानदेश,कोकणपट्टी, मराठवाडा जवळपास 30 मे पर्यंत भाग बदलत बदलत, दररोज पाऊस पडणार आहे, मुसळधार,कुठं वाहुनी,कुठं रिमझिम त्याच्यानंतर 31 मे ला वारे सुटणार आहे, 31 मे पासून ते 5-6 जूनपर्यंत ऊन पडणार आहे, सूर्यदर्शन घडणार आहे.
पेरणी केव्हा करावी?
सगळ्यांना विनंती कि, जमिनीमध्ये 1 फूट ओल असेल तर, पेरणी करायला काही हरकत नाही, कापसाच्या लागवडी करायच्या असेल तर, रेघाड्याला टोचून सरकी लावा, टोचून लावल्याने चांगलं पीक येत आणि तुम्ही लावल्याच्या नंतर जमिनीमध्ये 1 फूट ओल असल्यामौल तुमचा कापूस खराब होणार नाही, हे लक्षात घ्यायचं.
राज्यात मात्र ३० मे पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे, त्याच्यानंतर राज्यातला संपूर्ण पाऊस, १ जूनला मात्र सगळीकडे सूर्यदर्शन होणार आहे.Panjab Dakh