बियाणं उगवणार की नाही? हे 3 घरगुती उपाय करून लगेच तपासा !

बियाणं उगवणार की नाही? हे 3 घरगुती उपाय करून लगेच तपासा !

Seed Germination Test :

खरीप हंगाम जस जसा जवळ येतो, तस तशी शेतकऱ्यांची शेतीच्या कामाच्या  तयारीचा  वेग घेत असते. पेरणीपूर्वीची तयारी म्हणजे योग्य बियाण्याची निवड आणि त्याची उगवणक्षमता तपासणे हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. कारण चांगल्या उत्पादनासाठी सर्वप्रथम बियाणे उगवणक्षम असणे आवश्यक आहे. जर बियाणे निकृष्ट असेल, तर संपूर्ण मेहनत, वेळ आणि पैसा वाया जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच्या घरी बियाण्याची उगवणक्षमता तपासून खात्री करून घ्यावी, यासाठी काही सोप्या आणि शास्त्रीय पद्धती आहेत.

Seed Germination :

सर्वप्रथम समजून घ्या की बियाण्याची उगवणक्षमता म्हणजे काय – बियाणे मातीमध्ये टाकल्यानंतर त्यातून किती टक्के बियाणे उगवतात हे तपासणे. सामान्यतः ७०%  अधिक बियाणे अंकुरित झाली, तर ती पेरणीसाठी योग्य समजली जातात.

घरकुल योजना 2025 साठी शेवटची संधी

बियाण्याची उगवणक्षमता तपासण्यासाठी खालील 3 सोप्या पद्धती वापरता येतात: Seed Germination :

1) गोणपाट पद्धत:
या पद्धतीत शेतकरी 100 बियाण्यांचे तीन वेगळे नमुने तयार करतात. एका ओल्या गोणपाटावर 10-10 बियाण्यांच्या रांगा लावतात आणि वरून दुसरा ओला गोणपाट ठेवतात. ही गुंडाळी सावलीत आणि उबदार ठिकाणी ठेवली जाते. सुमारे 6–7 दिवसांनी उगवलेली बियाणे मोजून त्यांचे प्रमाण काढले जाते. जर 70% किंवा त्यापेक्षा अधिक बियाणे उगवली, तर ती योग्य आहेत. ही पद्धत स्वस्त, सोपी आणि घरच्या घरी सहज करता येण्यासारखी आहे.

2) रद्दी पेपर पद्धत:
या पद्धतीसाठी रद्दी कागदाला चार घड्या घालून तो ओला करावा लागतो. त्यावर एकूण 100 बियाण्यांच्या 10 ओळी (प्रत्येकी 10 बिया) लावल्या जातात. त्यानंतर कागद गुंडाळून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवावा. 5–6 दिवसांनी पिशवी उघडून अंकुरित झालेल्या बियाण्यांचे प्रमाण पाहावे. 70% पेक्षा जास्त बियाणे उगवली, तर ती योग्य आहेत. ही पद्धत कागदाच्या उपलब्धतेमुळे सर्वसामान्यांसाठी सहज आहे.Seed Germination :

3) पाण्यात भिजवण्याची त्वरीत पद्धत:
या पद्धतीत 100 बियाण्यांचे तीन नमुने घेतले जातात. बियाण्यांना साधारण 5–7 मिनिटे पाण्यात ठेवले जाते. जे दाणे फुगतात, सुरकुततात किंवा पाण्यावर तरंगतात, ते खराब समजले जातात आणि बाजूला ठेवले जातात. जी बियाणे टरफलसह घट्ट, एकसंध आणि गुळगुळीत आहेत, ती वापरण्यास योग्य मानली जातात. ही पद्धत वेगवान असल्यामुळे वेळेच्या अभावात खूप उपयुक्त ठरते.Seed Germination :

बियाण्यावर पेरणीपूर्वी प्रक्रिया करणे का आवश्यक आहे?
जरी बियाणे उगवणक्षम असले, तरी त्यावर बुरशीनाशक (Fungicide) आणि जैविक खत (Biofertilizer) यांची प्रक्रिया केल्यास बियाण्याचे संरक्षण अधिक चांगले होते. या प्रक्रियेमुळे बियाणे जमिनीत टाकल्यानंतर लगेच सडत नाही, त्यावर रोगजंतूंचा प्रादुर्भाव होत नाही आणि सुरुवातीच्या वाढीला चांगली चालना मिळते. जैविक खतांमुळे मुळांची चांगली वाढ होते, मातीतील पोषणद्रव्ये सहज मिळतात आणि एकूणच पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढते.Seed Germination :

दरवर्षी नवीन बियाणे घ्यावे का? Seed Germination :
शेतकऱ्यांमध्ये असा एक गैरसमज आहे की दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करणे गरजेचे आहे. मात्र, काही पिकं जसे की – मूग, उडीद, गहू, सोयाबीन, भुईमूग, चवळी ही स्वपरागसिंचीत (Self-Pollinated) पिके असल्यामुळे ती एकाच जातीची पुढच्या पिढीतही टिकून राहतात. त्यामुळे एकदा दर्जेदार बियाणे घेतल्यानंतर योग्य प्रकारे साठवणूक आणि उगवणक्षमता तपासल्यास त्याचे बियाणे पुढील २ वर्षांपर्यंत वापरता येते. त्यामुळे सतत बाजारावर अवलंबून राहण्याची गरज नाही आणि बियाण्यावर होणारा खर्चही कमी करता येतो.

2 thoughts on “बियाणं उगवणार की नाही? हे 3 घरगुती उपाय करून लगेच तपासा !”

Leave a Comment