एक रुपयात करा पिक विमा योजनेचा ऑनलाईन अर्ज

रब्बी हंगामातही केवळ एक रुपयांत रब्बी पीक (Rabbi Pik Vima) विमा भरता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबरची अंतिम मुदत देण्यात आली आहे. रब्बी हंगामात पिकांना विमा सरंक्षण मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीत विमा भरणे गरजेचे आहे.

Rabbi Pik Vima

रब्बी पीक विमा योजना – Rabbi Pik Vima:

रब्बी हंगामातही प्रति अर्ज एक रुपयांत पीक (Rabbi Pik Vima) विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. Grab your audience’s attention कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिकतेप्रमाणे योजनेत सहभागी होता येईल. पीक (Rabbi Pik Vima) विमा योजना अधिसूचित पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू राहणार आहे.

रब्बी हंगामात विविध पिके अधिसूचित करण्यात आली आहेत. मुदतीपूर्वी शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी व्हावे, यासाठी कृषी विभागाकडून गावस्तरावर जनजागृती केली जात आहे.

सामूहिक CSC सेवा केंद्रावर भरता येईल ऑनलाईन अर्जः

पीक (Rabbi Pik Vima) विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना सहजपणे अर्ज करता यावा, यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचीदेखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज संकेतस्थळावर स्वतः तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र यांच्यामार्फत अर्ज करता येतो.

मुदतीपूर्वी विमा भरावा.

पिकांना विमा संरक्षण असल्यास नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास भरपाई म्हणून विमा कंपनीकडे मोबदला मागता येतो. त्यासाठी रब्बी हंगामात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतीपूर्वी अर्ज करणे गरजेचे आहे.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for Rabbi Pik Vima): 1 रुपयात पीक (Rabbi Pik Vima) विम्याचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

पीक विमा अॅप (Rabbi Pik Vima App): पीक विमा अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 विमा कंपनी संपर्कः विमा कंपनी संपर्क यादीसाठी इथे क्लिक करा,

सामायिक सुविधा केंद्राच्या (CSC) माध्यमातून विमा अर्ज (Crop Insurance Application) भरताना शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे शुल्क देणे अपेक्षित आहे. यासाठी शेतकऱ्याने स्वतःचा सातबारा आठ अद्ययावत उतारा व इतर कागदपत्रे बरोबर घेऊन जाणे अपेक्षित आहे. April 6. 2024 जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रिकरण करण्याबाबत नियम, १९५९ मधील सुधारणा २०२४ याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्काची मागणी सामायिक सुविधा केंद्र चालकाने केल्यास याबाबत तक्रार खालील टोल फ्री क्रमांक वर करण्यात यावी, याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे कळविण्यात आले आहे.

सीएससी गव्हर्नर सर्विसेस इंडिया लिमिटेड

टोल फ्री क्रमांक :- १४५९९/१४४४७

Rabbi Pik Vima

Leave a Comment