PM Kisan Fraud App : शेतकऱ्यांनो सावध रहा | फसव्या पीएम किसान ॲप्लीकेशन पासून सावध रहा अन्यथा तुमचे पण बँक खाते होणार रिकामे
PM Kisan :
शेतकऱ्यांनो सावध रहा | फसव्या पीएम किसान ॲप्लीकेशन पासून सावध रहा अन्यथा तुमचे पण बँक खाते होणार रिकामे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या सोशल मीडिया म्हणजे व्हाट्सअप च्या माध्यमातून फसव्या आपले भाव पासून सावध राहा अन्यथा तुमचे सुद्धा बँक खाते रिकामी होऊ शकते. PM Kisan Fraud App
आत्ताच राज्यातील शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता हा डीबीटी द्वारे वितरित करण्यात आलेला आहे. परंतु काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना त्यांचा हप्ता वितरण प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान आपल्याला हप्ता मिळाला की नाही हे पाहण्यासाठी काही सायबर भामटे हे शेतकऱ्यांना फेक पीएम किसान ॲप ची लिंक पाठवून ती मोबाईल मध्ये इन्स्टॉल करण्यास सांगतात आणि त्याद्वारे ते बँक तपशील ओटीपी सर्व संदेश त्यांच्याकडे घेतात आणि त्याद्वारे ते संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून पैसे काढून घेतात. त्यामुळे कोणतेही असे फेक ॲप शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करू नये आणि आपला ओटीपी कोणाला सुद्धा शेअर करू नये.
अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा
याच दरम्यान, राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील 5 शेतकऱ्यांची अशा प्रकारे मोठी फसवणूक झाल्याचं समोर आलेले आहे. झाले असे की, व्हॉट्सअॅप त्यांना पीएम किसान अॅप लिंक पाठविण्यात आली आणि त्यांच्या खात्यातून एकूण 7 लाख रुपये काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी ही सावध करणारी बातमी आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गिरगावमध्ये शेतकऱ्यांना मोबाईलवर पीएम किसान अॅप ची बनावट लिंक पाठवून सायबर भामट्यांनी 5 शेतकऱ्यांच्या खात्यातील 7 लाख रुपयांची रक्कम लंपास केली आहे. PM Kisan Fraud App
तर या शेतकऱ्यांना बँकेत असलेल्या खात्यामधून अचानक पैसे डेबिट होत असल्याचे संदेश आल्यानं शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली, त्यानंतर शेतकऱ्यांनी हिंगोलीच्या पोलीस मुख्यालयातील सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.
तर, सर्व शेतकरी बांधवांनी व्हॉट्अॅप वर पाठविण्यात आलेल्या अशा लिंक किंवा अॅप वर क्लिक करू नये आणि तसेच व्हॉट्सअॅप वर पाठविण्यात आलेले कोणतेही अण्ड्रोइड अॅप मोबाइल वर इंस्टॉल करू नये. PM Kisan Fraud App
सर्वांना विनंती आहे की PM Kisan list. Apk, Gharkul yojana.Apk, CSC CENTER.APK, SBI Rewards.APK, MGB Rewards.APK, Solar Pump list. Apk इत्यादी कुठलीही APK (android app)
फाईल डाऊनलोड करून install किंवा उघडू नये म्हणजे ह्या PDF किंवा डॉक्युमेन्ट फाईल नसतात. तर ही APK फाईल डाऊनलोड किंवा इंस्टॉल केल्यावर लगेच आपला मोबाईल चे नियंत्रण जाते म्हणजे मोबाईल हॅक होतो, तसेच हॅक करणारी व्यक्ती त्या मोवाईल वरून ग्रुप वर ही APK फाईल सर्व ग्रुप वर पाठवते. व त्या मोबाईल वरील फोनेपे, गुगल पे, पे टीम, अमेझॉन सारखे अॅप हॅक करून धडाधड 7 ते 8 OTP येतात व बैंक खाते रिकामे…
सर्व शेतकरी बांधवांनी याबाबत ची काळजी घ्यावी.
खालील प्रमाणे अण्ड्रोइड ॲप मोबाइल वर पाठविले जाते तर असे कोणतेही अण्ड्रोइड अॅप मोबाइल वर इंस्टॉल करू नका