महाराष्ट्रातील एक शेतकरी जास्तीत जास्त किती जमीन खरेदी करू शकतो? वाचा सविस्तर

Jamin Kharedi : महाराष्ट्रातील एक शेतकरी जास्तीत जास्त किती जमीन खरेदी करू शकतो? वाचा सविस्तर

Jamin Kharedi : (Land Buying)

महाराष्ट्रातील लागवडीयोग्य असलेली जमीन (Jamin Kharedi Niyam) कमी होत चालली आहे. याचे कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आणि शहरीकरण, वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीचे मोठ्या प्रमाणात विभाजन होत आहे. त्यामुळे राज्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेकजण आता नवीन शेतजमीन खरेदीकरण्याचा विचार करत आहेत.

Land Buying

शेती करण्यासाठी तसेच गुंतवणूक म्हणून शेतजमीन विकत घेण्याचा जर तुमचा प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. खरंतर वेगवेगळ्या राज्यातील जमीन खरेदी संबंधित वेगवेगळे नियम अस्तित्वात आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात शेतजमीन खरेदीचे नियम नेमके काय सांगतात. आपल्या राज्यात एक व्यक्ती जास्तीत जास्त किती शेतजमीन (Land Buying) खरेदी करू शकतो? या प्रश्नाचे उत्तर या लेखातून घेऊयात….

अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

महाराष्ट्रात सिलिंग कायदा (Ceiling Act) अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार आपल्या राज्यात एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त किती जमीन असावी? याबद्दल नियम सांगितले गेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या नावावर मर्यादेपेक्षा जास्त जमीन असेल तर सरकार ती संपादित करून इतर व्यक्तींना वाटप करण्याची तरतूद आहे. पण महाराष्ट्र ज्या लोकांच्या नावे आधीच शेतजमीन आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागतो..

जे लोक शेतकरी आहेत, त्यांना शेतजमीन खरेदी करण्याचा अधिकार मिळतो, ज्यांच्याकडे सातबारा उतारा नाही, अशा लोकांना महाराष्ट्रात जमीन खरेदीचा अधिकार नाही. म्हणजेच राज्यात फक्त शेतकरी जमीन खरेदी करू शकतो. शेतकरी व्यतिरिक्त इतर लोकांना जर जमीन खरेदी करायची असेल तर त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागतो, रीतसर परवानगी घ्यावी लागते. पण जमीन खरेदीला परवानगी द्यायची की नाही, हे जिल्हाधिकारीच ठरवतात.

हे कार्ड असतील तुम्हाला मिळणार या सुविधा मोफत All Government Schemes

किती जमीन खरेदी करू शकतो..

दरम्यान महाराष्ट्रात एक शेतकरी जास्तीत जास्त किती जमीन खरेदी करू शकतो, याबाबतचा सिलिंग कायद्यातील नियम समजून घेऊयात, सिलिंग कायद्यानुसार बागायती शेती असेल म्हणजे ज्या ठिकाणी बारा महिने शेती केली जाऊ शकते, अशी बागायती शेती असल्यास एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 18 एकर जमीन खरेदी करता येते. मात्र जर शेती ही हंगामी बागायती असेल तर अशावेळी एक शेतकरी जास्तीत जास्त 36 एकर जमीन खरेदी Land Buying करू शकतो.

Land Buying

म्हणजे एका शेतकऱ्याच्या नावावर जास्तीत जास्त 36 एकर हंगामी बागायती जमीन असू शकते. जिथे बारा महिने पाणीपुरवठा नाही, पण एका पिकासाठी पाणीसाठा आहे, अशा ठिकाणी जास्तीत जास्त 27 एकर जमीन खरेदी करता येते. पण जर जमीन कोरडवाहू असेल तर एक शेतकरी जास्तीत जास्त 54 एकर एवढी जमीन खरेदी करू शकतो. म्हणजेच महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याच्या नावावर जास्तीत जास्त 54 एकर एवढी जमीन असू शकते.

Organic Farming : युवकाने घेतलाय सेंद्रिय शेतीचा ध्यास तयार केली थेट ग्राहक बाजारपेठा

महसूल व वन विभाग

1 thought on “महाराष्ट्रातील एक शेतकरी जास्तीत जास्त किती जमीन खरेदी करू शकतो? वाचा सविस्तर”

Leave a Comment