Agriculture Technology: तंत्रज्ञानाच्या साह्याने पशुपालनः डिजिटल गोठ्यांची नवी युगाची सुरुवात
Smart Dairy Farming पशुपालनातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता यांच्या व्यवस्थापनात जाती पडवू शकली। सेन्सर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटरनेट ओपा थियन (107) सारख्या तंत्रज्ञानाद्वारे अनापराचे मारोग्या, दूध उत्पादन आणि व्यवस्थापन सहजतेने नियंत्रित करणे शक्य आहे. या लेखात डिजिटल पशुपारसनाच्या संधी आणि त्याचे फायदे वर प्रकाश टाकण्यात आला आहे. Agriculture Technology
Artificial Intelligence and Animal Husbandry: Agriculture Technology
है मी पाहिलेले चित्र आहे चौदा वर्षांपूर्वीचे… डेअरी उद्योगातील माहिती तंत्रज्ञानाची झलक मला इसाईल दौयामध्ये पाहायला मिळाली होती. आता तर इंटरनेट ऑफ थिंग्ज, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सगळीकडे होऊ लागला आहे. पशुपालन देखील त्याला अपवाद नाही. आपल्याकडील पशुपालनाचा विचार करता गोठ्यात जनावराची संख्या दोनपासून ते फ्वासपर्यंत दिसते.
सध्या पशुपालकांसमोर गायी, म्हशींचे आरोग्य, आहारातील त्रुटी, कुशल मजुरांचा अभाव, जनावरांच्या व्यवस्थापनातील अयोग्य नोंदी या समस्या आहेत. त्यामुळे गोठा नफ्यात आहे की तोट्यात हेच कळत नाही. ही अडचण लक्षात घेऊन देशातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी सेन्सर आधारित पशू व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. गावातील पशुपालकांचा गट संयुक्तपणे एकाच प्रणालीचा वापर करू शकतो, असे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे.
अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा
याद्वारे जनावरांचे दैनंदिन तापमान, आहाराचे पचन, आरोग्यातील चढ-उतार तसेच माजावर आलेली गाय, दूध उत्पादनाच्या नोंदी ठेवल्या जातात. प्रत्येक पशुपालकास मोबाइल अॅपवर प्रत्येक गायीची तांत्रिक माहिती पाठविली जाते. आपल्याकडे मोबाइल, सेन्सर, ब्लॉक चेन तंत्रज्ञान उपलब्ध असल्याने गावातील डेअरीला सर्व गोठ्यातील जनावरांच्या नोंदी एकाच ठिकाणी ठेवणे शक्य आहे. Agriculture Technology
येत्या काळात गोठ्यामध्ये डेटा लॉगर पल्स इंटरनेट मोडेम, नेक बेल्ट, सायलेज सेन्सर, आरएफआयडी इअर टॅग, मिल्किंग मशिन फ्लो मीटर सेन्सर, तापमान, आर्द्रता मोजणारा सेन्सर, दूध उत्पादन मोजणारा सेन्सर, स्वयंचलित हवामान केंद्र आणि ईआरपी प्रणालीचा वापर महत्त्वाचा ठरणार आहे.
दुग्धव्यवसाय: एक फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय Dairy Farming
यातून जनावरांची आरोग्य आणि दूध उत्पादन क्षमता कळते. त्यानुसार व्यवस्थापनात बदल करून जनावरांचा ताण कमी करून दूध उत्पादनात सातत्य ठेवणे सोपे जाईल. गोठ्यातील वातावरणात होणारे बदल किंवा जनावरातील मुका माज ओळखण्यासाठी संगणक तंत्रज्ञानाधारित उपकरण (आर्टिफिशियल हीट डिटेक्टर नोज) बाजारात उपलब्ध आहे. Agriculture Technology
याचबरोबरीने गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन आणि मजूर बचतीसाठी मिल्किंग मशिन, वीसीएस सेन्सर, टीएमआर मिक्सर, कुट्टी यंत्र आणि पशुखाद्य निर्मिती यंत्रणा तसेच ऑनलाइन जमा-खर्च माडणारी प्रणाली गोठ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार आहे.राज्यातील पशू संशोधन प्रकल्प तसेच खासगी प्रयोगशाळामधील अत्याधुनिक यंत्रणा दूध आणि चाऱ्यातील घटकांची अत्यंत कमी वेळेत तपासणी करून देतात. या प्रयोगशाळेत स्वयंचलित ब्लड अ नालायझर, हिमोग्राम, सोमॅटिक सेल काउंटर आणि इलेक्ट्रोलाइट अ नालायझर सारखी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत. पशुपालकांनी याचा लाभ घेतला पाहिजे.Agriculture Technology
1 thought on “Agriculture Technology: तंत्रज्ञानाच्या साह्याने पशुपालनः डिजिटल गोठ्यांची नवी युगाची सुरुवात”